Blogger मध्ये Custom Domain कसा add करायचा? | ShoutMeMarathi
ब्लॉग

Blogger मध्ये Custom Domain कसा add करायचा?

Written by Team Marathi

पहिल्या article मध्ये तुम्हाला सांगितलं होत कि free मध्ये blog कसा बनवायचा. तर एका article मध्ये आम्ही तुम्हाला domain कसा विकत घ्यायचं हे सांगितले होते. जर तुम्ही पहिल्यांदा आमच्या blog वर आलेले असाल तर या लेखाच्या आधी हे जरूर वाचा.

बरेच लोक विचार करत असतील आपण free मध्ये blog बनवला आहे. मग आता separate domain ची काय गरज? Blogger हे Google च product आहे. Blogger तुम्हाला अगदी फुकटात Blog बनवायची सुविधा देते. पण बनवेला Blog एका sub-domain सोबत येतो. जसे कि shoutmemarathi.blogger.com.

Sub-Domain म्हणजे काय?

तुम्ही जेव्हा एखादे domain विकत घेता तेव्हा त्या domain च्या मध्ये तुम्ही अनेक sub-domain बनवू शकता. उदाहरण म्हणजे shoutmemarathi.com या domain मध्ये आपण mobile.shoutmemarathi.com किंवा hindi.shoutmemarathi.com असे कितीही domain बनवू शकतो.

“एखाद्या घरामध्ये जसे kitchen, bedroom, hall या गोष्टी आपण आपल्या सुविधेनुसार बांधतो अगदी तशाच प्रकारे domain मध्ये आपण sub-domain आपण आपल्या सुविधेनुसार बनवू शकतो”

Blogger मध्ये Domain Name वापरण्याचे फायदे

Blogger वर Custom domain name वापरण्याचे खूप जास्त फायदे आहेत. जर तुम्हाला वाटत असेल कि जर Blogger आपल्याला फुकटमध्ये एक sub-domain देत असेल तर मग एक custom domain विकत का घ्यायचं? अन नंतर ते blog ला का जोडत बसायचं?

Profession Look

sub-domain खूप मोठा अन ऐकायला विचित्र अन लक्षात ठेवायला तितकाच अवघड असतो उदाहणार्थ shoutmemarathi.blogger.com पेक्षा shoutmemarathi.com हे ऐकायला जास्त छान व लक्षात राहायला जास्त सुविधाजनक आहे. custom domain तुमच्या website ला त्यामुळे एक professional look देणार. custom domain सोबत तुम्ही तुमच्या site साठी एक professional email address पण बनवू शकता जसे कि admin@shoutmemarathi.com

Alexa व इतर website वरची Ranking-

अशा खुपश्या websites आहेत ज्या तुमच्या sites च्या views नुसार ranking देतात. Alexa.com ही त्यामधील views च्या क्रमाने देशात व जगात websites ला ranking करणारी website. तर अशा बऱ्याचश्या sites .blogspot किंवा .blogger websites ला लवकर rank करत नाहीत. (खुपदा तर ignore करतात)

Search Ranking

तुम्ही एखादी website बनवता तेव्हा ती जास्तीत जास्त लोकांनी पहावी ही तुमची इच्छा असते. 100-200 किंवा जास्तीत जास्त 1000 लोकांपर्यंत तुम्ही ती पोहचवूसुद्धा शकाल. पण जेव्हा तुम्हाला तुमची site यापलीकडे पोहचवायची असते तेव्हा custom domain खूप महत्वाचे आहे. कारण Google custom domain ला आपल्या search result मध्ये जास्त प्राधान्य देते.

Adsense Aproval

Adsense हे Google चच एक product आहे जे तुमच्या websites वर adds serve करते. अन Blogger याच्या माध्यमातून पैसे कमवू शकतात. या Adsense च्या account साठी aproval ची proccess आहे. पण Adsense ला काही फरक पडत नाही कि तुमच्याकडे custom domain आहे कि Blogger चा फ्री sub-domain. adsense दोन्हीलासुद्धा aproval देते. पण जर तुमच्याकडे Custom Domain असेल तर तुमचे account लवकर aprove होण्याची जास्त शक्यता असते.

Blogger ला Custom Domain कसे जोडावे?

Blogger वर Custom Domain Name add करणे खूप जास्त सोपे आहे. जर तुमचा एखादा free blog आहे अन तुम्हाला custom domain name add करायचे आहे. तर हे article वाचत रहा.

मी बहुदा BigRock किंवा GoDaddy वरूनच domain विकत घेतो. तुम्हाला domain कसा खरेदी करायचा माहिती नाही तर हे article नक्की वाचा.

Part 1 – Blogger Settings

१ आपल्या computer मधून Blogger.com उघडा. Blogger उघडल्यानंतर तुमच्या Gmail account वरून Login करा.

२ तुम्ही ज्या blog ला custom domain जोडू इच्छिता तो blog select करा.

Blogger custom domain

३ setting वर click करा त्यानंतर basic वर click करा.

४. तुमच्या blog च्या address च्या खाली +set up a third-party URL for your blog लिहलेले असेल. त्यावर click करा

५. आता तुम्हाला तिथे तुम्ही विकत घेतलेलं domain name टाकायचं आहे. तुमचे domain www.YourDomain.com अशा स्वरुपात असेल. Add केल्यानंतर “Save” बटणावर click करा.

Blogger CNAME Settings

६. आता तुम्हाला एक “error massage” येईल “We have not been able to verify your authority to this domain. Error 14” असा लिहिलेलं येईल. याचा अर्थ आहे कि तुमच्या domain चे DNS(domain name server) blogger साठी सेट नाही केलेलं.

तिथेच खाली तुम्हाला २ CNAME records लिहलेले दिसतील. आता तुम्हाला हे दोन records तुमच्या domain साठी add करायचे आहे. तुम्ही हे दोन प्रकारे करू शकता DNS setting file download करून ती godaddy वरती upload करून किंवा direct एडीट करून.

Part 2 : GoDaddy Or BigRock Settings

blogger वरचे तुमचे काम आता sample आहे. आता तुम्हाला तुम्ही जिथून domain विकत घेतले तिथे जाऊन Blogger वर भेटलेले 2 CNAME Records टाकायचे आहेत.

GoDaddy Settings

१. GoDaddy वर जाऊन लॉगीन करा.

२. Login केल्यावर profile वर click करून manage my domains वर जा.

godaddy settings

३. domain च्या पुढे DNS वर click करा

godaddy blogger custom domain

४. तुम्ही records मध्ये असाल… खाली ADD बटनअसेल त्यावर click करा

Godaddy CNAME adding

५. blogger मधून मिळालेले details तुम्हाला येथे टाकायचे आहेत.

Blogger custom domain marathi

सुरुवातीला CNAME select करा. त्यामध्ये होस्ट मध्ये www लिहा व त्यानंतर Points To मध्ये तुम्हाला blogger मध्ये www पुढे लिहलेली माहिती लिहा.

६. पुन्हा एकदा ADD वर click करा व CNAME select करा व तिथे blogger मध्ये मिळालेल्या माहितीतली दुसरी ओळ टाका.

आता save करा.

BigRock Settings

blogger वरचे तुमचे काम आता sample आहे. आता तुम्हाला तुम्ही जिथून domain विकत घेतले तिथे जाऊन Blogger वर भेटलेले 2 CNAME Records टाकायचे आहेत.

१. bigrock वर जाऊन लॉगीन करा.

२. Login केल्यावर तुम्हाला तुम्ही विकत घेतलेला domain दिसेल. त्यावर click करा.

Bigrock Custom Domain

३. domain वर click केल्यानंतर domain च page तुमच्यापुढे उघडेल.

Blogger custom domain bigrock setting

४. page वर खाली स्क्रोल करून DNS Management वर click करा

Bigrock domain Blogger setting

४. तुम्ही records मध्ये असाल… CNAME बटनावर click करा. त्यानंतर खाली आलेल्या CNAME बटनावर click करा

Bigrock CNAME Settings

५. आता blogger मधून मिळालेले details तुम्हाला येथे टाकायचे आहेत.

सुरुवातीला CNAME select करा. त्यामध्ये होस्ट मध्ये www लिहा व त्यानंतर Points To मध्ये तुम्हाला blogger मध्ये www पुढे लिहलेली माहिती लिहा.

Blogger custom domain add kara

६. पुन्हा एकदा ADD वर click करा व CNAME select करा व तिथे blogger मध्ये मिळालेल्या माहितीतली दुसरी ओळ टाका.

आता save करा.

Blogger Finale Shot

१. आता blogger मध्ये परत येऊन save करा. तुमचे domain add झालेलं असेल.

२.  आता परत एकदा एडीट वर click करा. शेवटी Redirect option वर tick करून save करायचे आहे.

Blogger Finale Settings

नवीन domain name पार्क व्हायला थोडा वेळ लागतो(२४ तासांपर्यंत लागू शकतो). जर तुम्ही domain name पहिल्यांदा जोडत असाल तर panic होऊ नका. तुम्हाला जर काही शंका असेल तर नक्की कमेंट करून विचार.

About the author

Team Marathi

आमचा हा छोटासा प्रयत्न आहे कि, तंत्रज्ञानातील व blogging विषयीच्या गोष्टी "माय-मराठी" मध्ये आणाव्यात.

Leave a Comment