Blogger Vs WordPress [Marathi] | ShoutMeMarathi
ब्लॉग वर्डप्रेस

Blogger कि WordPress: तुमच्यासाठी काय योग्य ?

Blogger Vs Wordpress In Marathi
Written by Team Marathi

blogging साठी खुपसारे Platforms उपलब्ध आहेत. पण या सर्वांमध्ये सगळ्यात चांगले कोणते असा प्रश्न जेव्हा समोर उभा राहतो तेव्हा blogger किंवा WordPress ही दोनच नावे डोळ्यासमोर येतात. अर्थात गेल्या काही दिवसात tumbler सुद्धा खूप लोकप्रिय झालेय. पण अजूनतरी tumbler, Blogger अन WordPress च्या पंक्तीत बसलेले नाहीये.

आपण मागच्या लेखात पहिले कि blogger किंवा WordPress वरती स्वतःचा blog किंवा Website कशी बनवायची. आजच्या लेखात आपण blogger व WordPress यांची तुलना, फायदे, तोटे पाहणार आहोत.

Blogger Vs WordPress In Marathi

जवळपास प्रत्येक Succesfull Blogger ने त्याचा पहिला Blog अथवा website ही Blogger.com वर बनवलेली असते पण नंतर बहुतांश जन WordPress वर shift होतात. पण याचा अर्थ असा नाहीये कि WordPress हे Blogger पेक्षा खूप चांगले आहे. आजही खुपसारे चांगले Blogs अन Websites या Blogger वर आहेत.

WordPress चे २ versions आहेत. पहिला आहे wordpress.com अन दुसरा आहे wordpress.org. यातला पहिला म्हणजे wordpress.com हा free आहे. तर wordpress.org साठी hosting घ्यावे लागते. याच लेखात आपण hosting अन self-hosted wordpress बद्दल सुद्धा संक्षिप्तपने सांगायचा प्रयत्न करू. पण सुरवात करूया Blogger vs WordPress या मुल प्रश्नाने.

Ownership (खरा मालक कोण?)

बऱ्याच लोकांना माहिती नाहीये पण blogger हे सुरवातीपासून Google च Product नव्हते. Blogger ची सुरवात Pyra Labs नावाच्या एका कंपनीने केली होती. 2003 मध्ये Google ने त्यांच्याकडून Blogger/Blogspot ला विकत घेतले. Blogger वरच्या सगळ्या website चा data, scripts सगळ Google च्या Servers मध्ये save होते. तुम्ही प्रत्यक्षपणे BackEnd ला काय चाललंय हे पाहू किंवा Access नाही करू शकत. तुम्ही इथे खूप आरामात blog उघडू सकता, अन एका account वरून तुम्ही 100 blog उघडू शकता. Google त्यांच्या server वर तुमचा data विनामुल्य टाकायची तुम्हाला परवानगी देते. पण अर्थात servers ची मालकी ही Google ची असल्याकारणाने जर Google ने ठरवलं तर ते तुमचा Data डिलीट करू शकते. अन त्याबद्दल तुम्हाला तक्रार करायचा सुद्धा हक्क राहत नाही. (अर्थात हे अस कधी होत नाही)

या उलट Self Hosted WP मध्ये तुम्हाला तुमच्या होस्टिंग मध्ये WordPress च software install करावे लागते. Hosting करता तुम्हाला ठराविक काळासाठी काही पैसे मोजावे लागतात. अन म्हणूनच तुम्ही Data वा इतर गोष्टींचे मालक राहता. Hosting बदलणे, Data ठेवणे अथवा उडवणे यावर फक्त तुमचा एकट्याचाच हक्क राहतो.

CONTROL (किती नियंत्रित करू शकता ?)

Blogger मध्ये एक खूप साधा, सोप्पा असा एक Managing System असतो. जो वापरायला खूप सोपा असल्याकारणाने अगदी कोणीही स्वतःचा blog खूप छानपैकी हाताळू शकतो. पण याच साधेपणामुळे तुम्हाला काही Extra Add करणे खूप कठीण होऊन जाते. अन तुम्हाला एका सोप्प्या पण साध्या गोष्टींसोबत काम चालवावे लागते.

याउलट WordPress हे Open Source Software असल्याने त्यात खूप विविध प्रकारे customisation करणे शक्य आहे. तुम्ही तेथे programming विना दुसर्यांनी बनवलेले अत्यंत छान Functions टाकू शकतो.

Blog ची Design

ज्याप्रमाणे एखाद्याच बाहेरच रूप त्याच सुरवातीच Impression कस राहत यात महत्वाचा भाग असते. त्याचप्रमाणे website अथवा blog ची design.. layout अथवा Theme महत्वाची असते. Blogger मध्ये हे Layout बदलणे किंवा त्यात बदल करणे हे खूप अवघड अन बऱ्याचदा त्यासाठी थोडस तांत्रिक ज्ञान आवश्यक असते. WordPress मध्ये याउलट काही मिनिटांमध्ये website च रंग-रूप पालटवले जाऊ शकते. सुरुवातीला सांगितल्याप्रमाने Blogger.com वरून सुरवात करणारे याच कारणांमुळे WordPress वर shift होतात. याशिवाय अनेक असे लोक आहेत जे अत्यंत Premium असे Template(फ्री-मध्ये किंवा विकत दोन्ही) देतात.

Blogger fayade Tote

SECURITY (किती सुरक्षा आहे?)

अगोदर चर्चा केल्याप्रमाणे, Blogger.com वरचा सगळा data हा Google च्या servers मध्ये save होतो. Google ही Intenet वरील सगळ्यात मोठी कंपनी असल्याकारणाने सहाजिकच Blogger हे इतर कोणत्याही दुसऱ्या site पेक्षा खूप जास्त Secure आहे. अन सोबतच तुमच्या website वर एकाच वेळी लाखो-करोडो लोग जरी आले तरी Google त्यांना आरामात manage करेल अन तुमचा blog slow नाही होणार. अन सर्वात महत्वाच म्हणजे हे सगळे एकदम फुकटात होत.

WordPress सुद्धा खूप secure आहे. पण तरीही तुम्हाला Security वर लक्ष ठेवावे लागते. सोबतच तुम्हाला hosting मध्ये Bandwidth, RAM यासारख्या बारीक गोष्टींवर लक्ष ठेवावे लागते. उदाहणार्थ Shout Me Marathi वर जर एकाच वेळी १०,००० लोक आले तर ही website slow होऊ शकते. म्हणजे खूप जास्त traffic यायला लागल्यावर एखादा Powerfull Server विकत घ्यावं लागू शकतो.

Website Transfer Kimva Migration 

Blogger मध्ये तुमचा blog एका ठिकाणावरून दुसरीकडे हलवणे शक्य आहे. Blogger Export करण्याची सुविधा तुम्हाला देतो. पण अस Move करण्याचा अनेक गोष्टींवर थोडा वाईट परिणाम होतो जसे कि SEO म्हणजे Google वरून येणारे Visitors कमी होतात.

WordPress मध्ये तुम्ही एका hosting वरून दुसरीकडे move करणे सोपे आहे. याचप्रकारे आता तुम्ही Blogger वरून WordPress वरसुद्धा खूप आरामात website move करू शकता.

खुपसारे शिकणारे विद्यार्थी(Tight Budget असल्याकारणाने) blogger.com वर website सुरु करतात अन नंतर WordPress वर Migrate करतात

Updates – Kon Lavkar Dete

कोणत्याही नवीन गोष्टींसाठी Blogger Platform लवकर तयार नसतो. तर याउलट WordPress Platform हा नवीन गोष्टींसाठी सदैव तयार. Blogger वर नवीन गोष्टी बहुदा अभावानेच Add होतात. याउलट WordPressच्या किमान वर्षाकाठी एकदा तरी संपूर्ण updates येतात. Plugins अन Themes दिवसाला किती तयार होतात देवजाने..!!

WordPress Fayade Tote

SEO – Google Madhe Rank

SEO हे सर्वात मोठे कारण आहे ज्यासाठी लोक WordPress निवडतात. सध्या Blogger सुद्धा पहिल्यापेक्षा SEO दृष्टीकोनातून खूप चांगले झालाय. पण WordPress आपल्या SEO Friendly Themes व Plugins मुळे या क्षेत्रातला अनभिषिक्त बादशहा आहे.

WORDPRESS कि BLOGGER 

या प्रश्नाचे उत्तर तुम्ही काय द्यायला तयार आहात असे आहे? वेळ कि पैसा …!!
जर तुम्ही विद्यार्थी आहात, तुमच्याकडे थोडा वेळ आहे. अन Blogging अथवा Web Development शिकत आहात तर Blogger तुमच्यासाठी आहे. Blogger मध्ये आजकाल खूप Premium अशा प्रकारच्या Themes सुद्धा available आहेत. पण अर्थात त्या customize कराव्या लागतील, त्यांच्याशी थोड खेळावं लागेल. अन नंतर तुम्ही WordPress वर तुमचा blog migrate करण्याचा पर्याय तर आहेच.

जर तुम्ही थोडे पैसे Invest करू शकता किंवा Blogging मध्ये थोडे जुने आहात तर तुम्ही WordPress मध्ये काम सुरु करायला काही हरकत नाही. अर्थात इथे तुम्हाला Hosting खरेदी करावी लागेल अन अर्थात तुमच्या website ला एक Premium look येयील.

मला अपेक्षा आहे तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल, अन जर मी तुम्हाला blogging platform निवडायला जरादेखील मदत करू शकलो असेल तर नक्की कळवा. सोबतच अन्य काही माहिती हवी असेल तर सांगा

About the author

Team Marathi

आमचा हा छोटासा प्रयत्न आहे कि, तंत्रज्ञानातील व blogging विषयीच्या गोष्टी "माय-मराठी" मध्ये आणाव्यात.

Leave a Comment