GoDaddy/BigRock Domain Kasa Vikat Ghyayacha | ShoutMeMarathi
ब्लॉग वर्डप्रेस होस्टिंग

GoDaddy / BigRock वरून Domain कसा खरेदी करायचा ?

Bigrock vs GoDaddy
Written by Team Marathi

तुमचा एखादा व्यवसाय आहे. किंवा तुम्हाला तुमच्याकडे असणाऱ्या Idea अथवा तुमचे विचार, माहिती Share करायची असेल तर तुम्ही नक्कीच Website/Blog बनवण्याच्या विचारात असाल. Website अथवा Blog बनवण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमच्या व्यवसाय अथवा कल्पनेला साजेस अस नाव हव असेल. म्हणजे तुम्हाला यासाठी Domain name विकत घ्याव लागेल.

हे Internet च युग आहे अन आजकाल अनेक लोग Blogging म्हणजे तुमचे विचार माहिती Share करून महिन्याला लाखो नव्हे तर करोडो रुपये कमावत आहेत.

आज मी तुम्हाला Domain Name विकत कस घ्यायचे ते शिकवणार आहे. Internet वर अनेक websites किंवा domain name registar आहेत जिथून तुम्ही domain name विकत घेऊ शकता. सगळ्याच websites वर एक account बनवून domain विकत घेता येते.

Domain Name हे 100 ते 500 रुपयांमध्ये मिळते अन .com, .net, .org, .in असे अनेक Extension आज उपलब्ध आहेत. सध्या भारतामध्ये २ websites GoDaddy BigRock या domain name registration मध्ये बलाढ्य मानल्या जातात. आजच्या लेखात आपण या दोन websites वरून domain कसा विकत घ्यायचं हे पाहणार आहोत.

GoDaddy Varun Domain Kasa Vikat Ghyayache?

GoDaddy वरती domain name विकत घेणे खूप सोप्पे आहे. तुम्ही facebook वर account उघडलंय का ?? हो..!! मग इतकच सोप्प आहे domain name विकत घेणे.

Step 1: Domain Name Search करा

१. तुमच्या mobile अथवा computer वरून GoDaddy.com उघडा.

Godaddy Domain Register

2. Home Page वर तुम्हाला Find Your Domain Name लिहिलेला एक search box दिसेल.

3. या box मध्ये तुम्हाला हवे असलेल(विकत घ्यायचे असलेले) नाव टाका अन Search Domain बटनावर click करा. मी इथे shoutmemarathi टाकतोय

४ जर तुमचे domain .com या Extension मध्ये available असेल तर खाली तुम्हाला ते नाव अन समोर किंमत दिसेल. त्याखाली इतर Extension जसे कि .in, .net, .org असे available नावेही त्यांच्या किंमतीसोबत दिसतील

Godaddy Domain Vikat ghya

५ Domain Name च्या समोर “Add To Cart” असा पर्याय असेल. तुम्हाला ज्या Extension मध्ये नाव विकत घ्यायचय त्यासमोरील Add To Cart या बटनावर click करा. तुम्ही एकापेक्षा अधिक domain name विकत घेऊ शकता पण त्यासाठी तुम्हाला सगळ्यांची किंमत द्यावी लागेल.

६. त्यानंतर “Continue To Cart” या बटनावर अथवा उजव्या कोपऱ्यात असलेल्या बास्केट(Cart) च्या चित्रावर click करा.

GoDaddy Domain Choose

७. NEXT step मध्ये तुम्हाला काही Additional गोष्टी, जसे Privacy, Hosting इत्यादी select करण्याचे option दिसतील. तुम्हाला हवे असतील तर अधिकचे पैसे भरून तुम्ही या गोष्टी खरेदी करू शकता. नंतर तुम्ही “Continue To Cart” button वर click करा.

८. नंतर तुम्हाला domain name किती वर्षांसाठी विकत घ्यायचं हे निवडावे लागेल. वर्षाच्या हिशोबाने पैसे असतील. Year Selection नंतर “Continue To Checkout” बटनावर click करा.

GoDaddy Account Login

Step 2: GoDaddy वर Register करा

१. जर तुमच GoDaddy वर Account असेल तर तुम्ही Login करा. अथवा “Create Account” वर click करा. तुम्ही facebook च्या account मधून सुद्धा login कर शकता यासाठी तुम्ही लॉगीन निवडा व त्यानंतर Continue with Facebook निवडा अन उघडलेल्या window मध्ये Allow करा.

GoDaddy Facebook Login

२. Create account वर click केलेल्यांनी, address, email. mobile number इत्यादी माहिती भरा. लक्षात ठेवा Email Id अन Mobile Number GoDaddy verify करते अन त्यावर PIN पाठवून verification केले जाते.

३. तुमच्या mobile वर पाठवलेला ४ आकडी number टाकुन account verify करा.

४. शेवटी तुम्ही Payment Information Select करा येथे तुम्ही debit card, credit card, net banking, UPI सोबतच PayTM ने सुद्धा Payment करू शकता. सर्व माहिती टाकल्यानंतर “Place Your Order” वर click करा. Payment केल्यानंतर तुम्हाला तुमच्या domain च्या detail मिळतील.

GoDaddy Payment

५. GoDaddy मध्ये Login करून तुम्ही Domain च्या settings मध्ये बदल करू शकता.
याकरता तुम्हाला Home Page वरील आपल्या Profile Name वर click करायचय. त्यानंतर “Manage My Domains” select करा. आता तुमचा domain website किंवा blog साठी तयार आहे.

BigRock varun Domain Kasa Vikat Ghya?

BigRock ही GoDaddy सारख्या अंतराष्ट्रीय कंपनीसारखी भारतीय कंपनी आहे. GoDaddy सारखाच अगदी सुलभतेने तुम्ही इथून domain खरेदी करू शकता. चला जाणून घेऊया Bigrock varun domain kasa vikat ghyayacha?

१ सुरुवातीला Bigrock ची official website(www.bigrock.in) वर जा.

२. तुम्हाला ज्या नावाचा domain विकत घ्यायचा आहे तो search box मध्ये टाका अन “Search Icon” बटनावर click करा.

BigRock Domain Purchase

३. आता तुम्हाला तो domain name available असलेल्या extensions सोबत दिसेल.

४. जो domain तुम्हाला विकत घ्यायचा आहे त्यापुढील Buy बटनावर click करा व “Checkout” पर्यायावर click करा.

Bigrock Domain Selection

५. Next Page वर BigRock च्या काही Extra services जसे कि Privacy protection, Hosting इत्यादी मिळतील. तुमच्या गरजेनुसार त्या add किंवा remove करा. त्यानंतर “Proceed To Payment” वर क्लिक करा.

BigRock Additional Services

६. आता तुम्हाला इथे लॉगीन किंवा register करायचे आहे. bigrock ची register करण्याची पद्धत आगद GoDaddy सारखीच आहे.

Create Bigrock Account

तुम्ही एकदा का domain खरेदी केला कि तुम्ही तुमच्या account मध्ये लॉगीन होऊन पाहू शकता. आज Shout Me Marathi मध्ये तुम्ही domain kasa kharedi karayacha शिकले. तुम्ही कोणत्याही website वरून domain विकत घेऊ शकता. shoutmemarathi.com हा domain मी BigRock वरून खरेदी केलेला आहे तर GoDaddy वरूनही मी २-३ domain विकत घेतलेले आहेत. तुम्हाला जर काही शंका असेल तर नक्की कमेंट करून विचारा.

About the author

Team Marathi

आमचा हा छोटासा प्रयत्न आहे कि, तंत्रज्ञानातील व blogging विषयीच्या गोष्टी "माय-मराठी" मध्ये आणाव्यात.

Leave a Comment