[Marathi] Free Blog/Website Kashi Banavayachi | ShoutMeMarathi
ब्लॉग वर्डप्रेस

FREE Blog व Website कशी बनवायची ?

Free blog kasa banavayacha
Written by Team Marathi

जर तुम्ही कधी Internet वरून पैसे कामविण्या बद्दल ऐकले असेल किंवा याबद्दल तुम्हाला माहिती असेल. तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल कि एका blog किंवा website मुळे लोक आरामात घरी बसून पैसे कमावतात. तंत्रज्ञानाचा हा एक आविष्कारच म्हणावा लागेल. सध्या Internet व online जगत ही पहिल्यापेक्षा खूपच popular गोष्ट आहे. अन या Internet वर सगळीकडे websites अन blogs चाच बोलबाला आहे. आज तुम्हाला जर कोणत्याही गोष्टीत जर काही मदत पाहिजे असेल एखाद्या प्रोब्लेमसाठीच solution हव असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपण Google मध्ये सर्च करतो. Google वर तुम्हाला त्या प्रश्नाची अनेक उत्तर मिळतात. तुम्ही म्हणू शकता कि Internet हे एक भल-मोठ माहितीच जाळ आहे.

पण तुम्ही कधी विचार केलाय का ? कि गुगल ही सगळी उत्तर स्वतः देतो का ? तर नाही, Google अनेक website वरून तुमच्या प्रश्नाशी जुळणारी उत्तर सापडवून तुमच्या समोर ठेवतो. इंटरनेटवर वेगवेगळ्या विषयाविषयी माहिती असणाऱ्या जाणकारांनी आपले blogs किंवा website बनवलेल्या असतात, अन या माध्यमातून ते माहिती share करत असतात. Google आपल्या crawlers च्या सहाय्याने या websites सापडावते अन तुमच्या search शी जुळणारे result तुम्हाला दाखवते.

website Kay ahe? Website kashi Banawayachi?

website कशी बनवायची याआधी वेबसाईट काय असते? आणी website आणी blog मध्ये काय अंतर असते ? हे जाणून घेणे महत्वाचे ठरेल. जेव्हा आपण एखाद पोर्टल website आहे अस म्हणतो तेव्हा आपल्या डोक्यात एक कंपनी येते. एक अशी कंपनी जी एकतर स्वतःची मार्केटिंग करत असते किंवा एखादी सेवा पुरवत असते. उदाहरणच द्यायचं झाल्यास फेसबुकच उदाहरण घेऊया, फेसबुक जगातली सर्वात मोठी social Networking Website आहे. या website च मुख्य काम आहे आपल्या मित्रांशी व नातेवाईकांशी जोडले जाणे व त्यांच्याशी online chat करणे. यासोबतच आपण इथे आपले फोटोज, विडीयोज त्यांच्यासोबत share करू शकतो.

Website Kashi Banavatat?

एक प्रोफेशनल website अथवा blog बनवायला अनेक गोष्टींची गरज असते. सर्वात आधी पैसे, जेणेकरून आपण domain register करू शकतो व hosting खरेदी करू शकतो. सोबतच आपल्याला web programming जसे कि HTML, CSS, JAVASCRIPT, PHP, .NET इत्यादींची माहिती असावी लागते. तुम्ही या सगळ्या गोष्टी outsource सुद्धा करू शकता. एखादा web developer काही रकमेच्या बदल्यात हे सर्व काम तुमच्यासाठी करू शकतो.

website बनवण्यासाठी प्रोग्रामिंग यावे लागते…!! कोडींग करावी लागते…!! या गोष्टी आता जुन्या झाल्यात…!! तुम्ही अगदी सोप्प्या पद्धतीने व कोणतेही technical background नसताना websites बनवू शकता फक्त shout me मराठी सोबत जोडलेले रहा.

जर तुम्हाला माहिती करून घ्यायचय कि free website कशी बनवायची. तर तुम्ही सुलभतेने ती स्वतः बनवू शकता. असे अनेक websites आहेत, जे तुम्हाला एक online platform उपलब्ध करून देतात. या online platform च्या मदतीने तुम्ही कोणतेही coding न करता आरामात website बनवू शकता. मी खाली काही website चे नाव देईल, जिथे register करून तुम्ही खूप सुलभतेने आपली website बनवू शकता. तुम्हाला अजून काही अडचणी असतील तर तुम्ही त्या नक्की विचारू शकता.

  1. www.wix.com
  2. www.websitebuilder.com
  3. www.sitebuilder.com
  4. www.sitey.com
  5. www.weebly.com

Blog Mhanje Kay? Blog kasa Banavatat?

blog चा concept website पेक्षा अगदीच वेगळा असतो. ज्याप्रकारे website ही एखाद्या कंपनीला represent करते व काही सुविधा देते. त्याउलट blog एक माहिती पसरविण्याच मध्यम आहे. समजा तुम्ही एक कंपनी आहात, जिथे तुम्ही काही product बनविता. या products च्या मार्केटिंग साठी तुम्ही एक website पण बनवली आहे. पण products ची माहिती, फायदे, उपयोग इत्यादी लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी blog मदद करतो. या सगळ्या गोष्टी तुम्ही ब्लोगद्वारे share करता. blogging हे popular होण्याच हे एक प्रमुख कारण आहे. Google मध्ये तुम्ही जेव्हा पुढच्या वेळी search कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल कि search result मध्ये जास्त results blogsच असतील.

free blog Kasa Banavatat?

फ्री ब्लोग म्हणजे असा ब्लोग जिथे तुम्हाला दमडीही खर्च करावी लागत नाही. जर तुम्हाला blogging शिकायची आहे. तर तुम्ही सुरवातीला एक free blog बनवून blogging च्या basic concept समजावून घेऊ शकता व त्यानंतर यात invest करू शकता.

free blog बनवण्यासाठी २ खूप popular platform आहेत, BLOGGER आणी WORDPRESS. या दोन्हीमध्ये काय चांगल आहे अन काय वाईट या विषयी एक लेख लवकरच shout me marathi वर मी टाकेल.

Blogger var free blog kasa banavatat?

Blogger(Blogspot) हे google च एक product आहे. जर तुमच्याकडे Gmail किंवा Google account असेल तर तुम्हाला इथे account बनवायची गरज नाही. Google आपल्या सगळ्या products साठी एक account असण्याची सुविधा देते. म्हणजे तुम्ही तुमच्या google account वरून blogger वर आरामात लॉगीन करू शकता.

१. तुमच्या संगणकावर कोणताही web browser उघडा, अन www.blogger.com किंवा www.blogspot.com वर जा.

२. इथे तुम्ही तुमची gmail id व password देऊन लॉगीन करा. जर तुम्ही अगोदरच gmail वरून लॉगीन असाल तर तुम्हाला लॉगीन साठी विचारणार नाही.

३. Login झाल्यावर तुम्हाला डाव्या कोपऱ्यात “New Blog” अस एक button दिसेल. या बटनावर click करा.

Blog kasa banavayacha

४. तुमच्या browser मध्ये एक नवीन Pop Up window उघडेल. तिथे तुम्हाला तुमच्या blog ची माहिती भरायची आहे.

Title – इथे तुम्हाला तुमच्या blog च नाव लिहायचं आहे

Address- इथे तुम्हाला एक Unique नाव द्यायचं आहे. जर तुम्ही दिलेलं नाव available असेल तर “This Blog address is  Available” अस लिहून येईल.

Free Blog Marathi

Template – ही तुमच्या blog ची design असते. तुमचा ब्लॉग कसा दिसेल हे यावरून ठरते. तुम्ही हे नंतर बदलवू पण शकता

५. सगळ fill-up झाल्यानंतर “Create Blog” या Button वर Click करा.

आता तुमचा blog रेडी झाला आहे. address field मध्ये तुम्ही निवडलेल नाव हा तुमच्या blog चा address आहे. उदाहणार्थ xxx.blogspot.com. free blog नेहमी एका sub-domain सोबत येतो. जसे इथे .blogspot.com

wordpress var free blog kasa banavatat

wordpress मध्ये blog बनवणे हे blogger वर blog बनविन्या इतकेच सोप्पे आहे

१. आपल्या कॉम्पुटर च्या browser मध्ये www.wordpress.com टाका

Wordpress free blog register

२. आता तुम्हाला तुमच account बनवायचं आहे. इथे तुम्हाला फक्त तुमची email id आणि pasword टाकून “Create my Account” button वर click करायचं आहे.

Login WordPress marathi

२. आता तुम्हाला खाली दाखवल्याप्रमाणे ऑप्शन दिसतील. त्यामध्ये Site च नाव(महत्वाच), कॅटेगरी select करा. मी येथे shoutmemarathi.com हे आपल्या website च नाव टाकल अन technology ही कॅटेगरी निवडली.

३. NEXT PAGE मध्ये तुम्हाला पुन्हा site च नाव टाकायचं आहे

४. Next Page मध्ये तुम्हाला WordPress blog साठी एक domain name निवडावे लागेल. blogger च्या address प्रमाणेच हा तुमचा address असेल. हे नाव अर्थतच unique असायला हव. नाव निवडल्यानंतर free बटनावर click करा

५. plans page मध्ये सुद्धा “Free” ऑप्शनला निवडा.

आता तुमचा wordpress blog एकदम तयार आहे. फक्त तुम्हाला एकदा तुमचा email account उघडून wordpress च्या मैल ला verify करायचं आहे. इथे तुमची website .wordpress सोबत येते. तुम्ही तुमच्या account मध्ये wordpress.com वरून login करू शकता.

या लेखामधून आपण शिकलो कि free blog/ website कशी बनवली जाते. जर तुम्हाला या संबंधी काही माहिती हवी असेल तर तुम्ही नक्की विचारू शकता.

About the author

Team Marathi

आमचा हा छोटासा प्रयत्न आहे कि, तंत्रज्ञानातील व blogging विषयीच्या गोष्टी "माय-मराठी" मध्ये आणाव्यात.

Leave a Comment